|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आरोग्यवंत होण्यासाठी योगा आवश्यक

आरोग्यवंत होण्यासाठी योगा आवश्यक 

वार्ताहर /अथणी :

प्रत्येकांनी आरोग्यवंत व्हावयाचे झाले तर दररोज योगा करणे आवश्यक आहे. योगामुळे शरीर निरोगी राहते, असे प्रतिपादन वचनानंद महास्वामीजी यांनी केले. तावशी (ता. अथणी) येथे विश्व लिंगायत पंचम साळी समाज तावशी यांच्यावतीने आयोजित गौरव कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिवबसव महास्वामी, सिद्धलिंग महास्वामी, मरुळसिद्ध महास्वामी, शांतवीर शिवाचार्य महास्वामी, मरुळ शंकर महास्वामी, शंकरानंद महास्वामी, मरुळ दयानंद स्वामी यांची उपस्थिती होती. वचनानंद स्वामीजी पुढे म्हणाले, आतापर्यंत आपण 80 देशात प्रवास केला आहे. प्रत्येक ठिकाणी योगा करण्याविषयी सल्ला दिला आहे. प्रत्येकाने शरीर संपत्तीकडे लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येकांनी शिक्षण घ्यावे. निरक्षरता दूर करा. गावात शांतता राखा, असे सांगितले.

यावेळी गच्छीन मठाचे शिवबसव महास्वामीजी म्हणाले, तावशी गावात आश्रम काढून आध्यात्मिक ज्ञान दिले पाहिजे. त्याला सदैव आमचे सहकार्य आहे. याप्रसंगी रावसाहेब ऐवळे, शिवानंद मालगावे, सत्याप्पा होल्यापनावर, बसगोंड माळगी, आण्णाप्पा सुतार, कुमार पाटील, अशोक गौरगोंड, मल्लिकार्जुन पाटील, आप्पासाहेब लखगौडर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.