|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सर्वाधिक अनुदान देऊनही शिक्षण खात्यात सुधारणा नाही

सर्वाधिक अनुदान देऊनही शिक्षण खात्यात सुधारणा नाही 

बेळगाव / प्रतिनिधी :

जिल्हा पंचायतीद्वारे सर्वाधिक अनुदान शिक्षण खात्यास देण्यात येते. मात्र या खात्यात अद्यापही सुधारणा झाली नाही. बऱयाच शिक्षकांसह अधिकारी वर्गाकडुन गैरप्रकार होत आहेत. तर सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याकडे अद्यापही म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. यापुढे तरी सरकारी शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हा पंचायत अध्यक्षा आणि जि. पं. च्या अर्थ आणि लेखा योजना स्थायी समितीच्या अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी बेळगाव आणि चिकोडीच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱयांना केली.

जि. पं. सभागृहात गुरूवारी जिल्हा पंचायतची अर्थ आणि लेखा स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आशा ऐहोळे यांनी सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच ना दुरूस्त आणि धोकादायक बनलेल्या सरकारी शाळा इमारतींचा मुद्दाही उपस्थित केला. समितीचे सदस्य गुराप्पा दाशाळ यांनी शाळा इमारतींच्या दुरूस्तींचा मुद्दा मांडून जिल्हा शिक्षणाधिकाऱयांना धारेवर धरले. विद्यार्थी जखमी झाल्यावरच शाळा इमारती दुरूस्ती करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. बैठकीत अतिथी शिक्षक, रस्ता दुरूस्ती, क्रिया योजना, वसतीगृहे या विषयासह सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार या विषयावर चर्चा करण्याबरोबरच सर्व खात्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तर असमाधानकारक उत्तरे देणाऱया अधिकाऱयांना समज देण्यात आली.