|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » निश्चलनीकरणाने घरगुती बचतीमध्ये वाढ

निश्चलनीकरणाने घरगुती बचतीमध्ये वाढ 

लोकांच्या बचतीमध्ये बदल   बँकांतील ठेवींच्या प्रमाणात घट : नक्त आर्थिक संपत्तीत वृद्धी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी निश्चनलीकरणाची घोषणा केल्याने देशातील नागरिकांच्या घरात बचत करण्याच्या सवयीमध्ये बदल दिसून आला. आरबीआयच्या अहवालानुसार, नोटाबंदीचा परिणाम भारतीयांवर उलट दिसून आले. पहिल्यांदा बँकेमध्ये ठेव जमा करण्यात येत होती, त्याऐवजी घरात रोकड ठेवण्यात येऊ लागली. बँकांतील ठेवीनंतर घरातील रोकडने दुसरे स्थान पटकावले. 2011 नंतर प्रथमच घरात ठेवण्यात येणाऱया रोख चलनात सर्वाधिक वाढ दिसून आली.

2017-18 या आर्थिक वर्षात घरात बचत ठेवण्याच्या प्रमाणात 2.8 टक्क्यांनी वाढ दिसून आली. मात्र ही वाढ गेल्या पाच आर्थिक वर्षात घरात करण्यात येणाऱया सरासरी बचतीच्या तुलनेत दुप्पट झाली. घरात रोकड ठेवण्याचे प्रमाण वाढल्याने बँका आणि अन्य कंपन्यांमधील ठेव 2.9 टक्क्यांनी घटली. 2014-15 मध्ये हे प्रमाण 4 टक्के आणि 2015-16 मधील प्रमाण 6.3 टक्के होते. बँकांमधील ठेवीमध्ये वाढ होण्याचे प्रमाण गेल्या पाच दशकातील सर्वात कमी होते. आरबीआयच्या धोरणामुळे ठेवीवरील व्याज दरात कपात करण्यात आल्याने बँकिंग क्षेत्रातील ठेवीचे प्रमाण घसरत आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार घरातील नक्त आर्थिक संपत्तीमध्ये 2017-18 मध्ये 7.1 टक्क्यांनी वाढ झाली. अर्थव्यवस्थेला हातभार लागण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचे काम ही संपत्ती करत असून ती पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी झाली आहे. 17 ऑगस्ट 2018 रोजी व्यवहारात असलेल्या चलनाचे मूल्य 19.38 लाख कोटी रुपये असून नोटाबंदीपूर्वीच्या तुलनेत हा अधिक आहे. याव्यतिरिक्त देशाचे चलन जीडीपी रेशोच्या तुलनेत पुन्हा उच्चांकावर पोहोचले आहे.