|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मानसरोवर यात्रेसाठी राहुल गांधी नेपाळमध्ये

मानसरोवर यात्रेसाठी राहुल गांधी नेपाळमध्ये 

काठमांडू

: तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेपाळमध्ये आगमन झाले आहे. त्यांचा एक दिवस काठमांडू येथील हॉटेलात मुक्काम राहणार आहे. त्यानंतर ते शनिवारी यात्रेसाठी निघतील, अशी माहिती नेपाळ सरकारने दिली आहे. त्यांचा दुसरा मुक्काम नेपाळगंज येथे होणार आहे. मानसरोवर हे हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ असून ते चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी चीनची अनुमती घ्यावी लागते. दरवर्षी ठराविक संख्येच्या यात्रेकरूंना चीन अशी अनुमती देत असतो. मागच्या एप्रिल महिन्यातच राहुल गांधींनी कैलास मानसरोवर यात्रा करण्याचा विचार बोलून दाखविला होता. त्यानुसार त्यांनी आता ही यात्रा करण्यास प्रारंभ केला आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत ही यात्रा होत असते.