|Sunday, January 26, 2020
You are here: Home » मनोरंजन » माय-लेकीच्या नात्यातला बोगदा

माय-लेकीच्या नात्यातला बोगदा 

नितीन केणी यांची प्रस्तुती असलेला ‘बोगदा’ हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील कंगोरे मांडणाऱया या चित्रपटाचा नुकताच सोशल नेट्वर्पिंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. निशिता केणी लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री मफण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका आहे.

 ‘बोगदा’ या चित्रपटाच्या शीर्षकामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱया या चित्रपटाचे पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिका केणी यांनीच केले आहे. स्त्राrव्यक्तिरेखेवर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल बोलताना त्या सांगतात की, स्त्राrप्रधान भूमिकेवर मराठीत कमी चित्रपट बनले आहेत. त्यामुळे ‘बोगदा’ या चित्रपटात मी स्त्राrव्यक्तिरेखेला अधिक महत्व दिले आहे. जगातल्या प्रत्येक आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणारा हा चित्रपट असून, त्यांचे मतभेद आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची नाजूक गुंफण या चित्रपटात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर आशयसमफद्ध कलाकृतीने परिपूर्ण असलेल्या बोगदा चित्रपटाला व्हीस्लिंग वूडच्या शिलेदारांचा मोठा हातभार लाभला आहे.

 चित्रपटाची दिग्दर्शिका स्वत: भारतातील या अग्रेसर फिल्म इन्स्टिटय़ूटची विद्यार्थिनी असून, छायाचित्रकार प्रदीप विग्नवेळू, संकलक पार्थ सौरभ, ध्वनी मुद्रणकार कार्तिक पंगारे, वेशभूषाकार यश्मिता बाने हे पडद्यामागील कलाकारदेखील व्हीस्लिंग वूडचेच असल्याकारणामुळे ‘बोगदा’ हा चित्रपट दर्जेदार कलाकृतीचा नमुनाच ठरणार आहे. या चित्रपटाचे निर्माते करण कोंडे हे देखील व्हीस्लिंग वूडचे माजी विद्यार्थी असून सुरेश पान्मंद, नंदा पान्मंद आणि दिग्दर्शिका निशिता केणी या चौकडीने मिळून बोगदा चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Related posts: