|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शिवपाल यांचा मोर्चामुळे समाजवादी पक्षाला लाभ

शिवपाल यांचा मोर्चामुळे समाजवादी पक्षाला लाभ 

लखनौ

 शिवपाल यादव यांच्या समाजवादी सेक्युलर मोर्चाने लोकसभा निवडणुकीवेळी उत्तरप्रदेशातील सर्व जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. शिवपाल यांचा हा निर्णय समाजवादी पक्षासाठी लाभदायक ठरणार असल्याचा दावा पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. शिवपाल बाहेर पडल्याने समाजवादी पक्षाला घराणेशाहीच्या आरोपांपासून मुक्ती मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले.समाजवादी पक्षात होत असलेल्या उपेक्षेमुळे नाराज झालेल्या शिवपाल यादव यांनी नवा पक्ष स्थापन केला असून यात त्यांना  अमर सिंग यांचे सहकार्य मिळाल्याचे मानले जाते. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव हे देखील नव्या पक्षात दाखल होतील असा दावा शिवपाल यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुलायम यांनी देखील पक्षात योग्य आदर मिळत नसल्याची व्यथा जाहीरपणे मांडली आहे.