|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » मलिंगाचे श्रीलंका संघात पुनरागमन

मलिंगाचे श्रीलंका संघात पुनरागमन 

आशिया चषक स्पर्धेसाठी लंका संघ जाहीर, अँजेलो मॅथ्यूजकडे कर्णधारपद

वृत्तसंस्था/ कोलंबो

यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिध्द असलेल्या 35 वर्षीय वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी लंकन संघात निवड झाली आहे. रविवारी 16 सदस्यीय श्रीलंका संघ जाहीर करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे, अँजेलो मॅथ्यूजकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

35 वर्षीय मलिंगा गेल्या वर्षापासून दुखापतीमुळे लंकन संघाबाहेर आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध वनडे मालिकेत त्याने आपला शेवटचा सामना खेळला होता. गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मलिंगाने गत महिन्यात स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करताना निवड समितीचे लक्ष्य वेधून घेतले होते. स्थानिक क्रिकेटमधील या यशाच्या जोरावर मलिंगाची लंकन संघात वर्णी लागली असल्याचे निवड समितीने यावेळी स्पष्ट केले. याशिवाय, अमिला अपोन्सो, कसून रंजिता या युवा खेळाडूंचीही संघात वर्णी लागली आहे. 15 सप्टेंबरपासून युएईमध्ये आशियाई स्पर्धेला प्रारंभ होईल.

श्रीलंका संघ – अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, कुशल मेंडिस, उपुल थरंगा, दिनेश चंडिमल, दानुष्का गुणथिलका, थिसारा परेरा, दसून शनाका, धनंजय डिसिल्वा, अकिला धनजंया, दिलरुवान परेरा, अमिल अपोन्सो, कसून रंजता, सुरंगा लकमल, दुष्यमंता चमीरा व लसिथ मलिंगा.

Related posts: