|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » देशभरात दहीहंडीचा थरार सुरू

देशभरात दहीहंडीचा थरार सुरू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जन्माष्टमी सकाळपासून दहीहंडीचा जल्लोष सुरू झाला आहे. मागील दोन वर्षे सार्वजनिक दहिकाल्यावर न्यायालयाच्या नियमांचे विरजण पडले असली तरीही उत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. यावर्षीही अनेक मंडळांनी सकाळपासून राज्यात मोठय़ाप्रमाणात हंडय़ा फोडण्यासाठी कूच आहे. कोण किती थर लावते. कोण थरथरते. कोणाच्या हाती बक्षिसाचे लोणी लागते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात राजकीय हंडय़ांपासून सामाजिक हंडय़ांचे आयोजन करण्यात आले आहे. यातही ठाण्यातील हंडय़ा दरवषीप्रमाणे यावषीही मंडळांना आकर्षित करत आहेत. शहराचा विचार करता भायखळा, गिरगाव, वरळी, लालबाग, दादर, माहीम, प्रभादेवी, माटुंगा आणि धारावी परिसरात राजकीय नेत्यांसह मंडळांच्या हंडय़ा गोविंदांचे लक्ष वेधून घेणार आहेत. मुंबईमध्ये लहान, मध्यम आणि मोठय़ा अशा सगळय़ा दहीहंडय़ांचा विचार केला तर ही संख्या हजारभर होईल असे सांगण्यात येते.

14 वर्षांखालील गोविंदा थरात नसावा याची वारंवार सूचना द्यावी, तसे आढळल्यास त्या मंडळास थर लावू देऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. मागील वषी बालगोविंदांना सहभागी करणाऱया मंडळांवर कारवाई होत होती. यंदा मात्र पालकांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत. फक्त मुंबईत नाही, तर ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह मुख्य शहरांमध्ये पोलिसांनी असा इशारा दिल्याचे समजत आहे.