|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाडय़ा

गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाडय़ा 

ऑनलाईन टीम / पुणे

गणेशोत्सवानिमित्त रेल्वेच्या वतीने विशेष गाडय़ांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार 18 गणपती विशेष रेल्वे सोडल्या जाणार होत्या. याबाबत रेल्वेने काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रक काढले होते. परंतु, प्रत्येक गाडीची एक अतिरिक्त फेरी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. 01431 पुणे-सावंतवाडी 17 सप्टेंबर, 01432 सावंतवाडी-पुणे 20 सप्टेंबर, 01447 पुणे-सावंतवाडी 21 सप्टेंबर, 01448 सावंतवाडी-पुणे 22 सप्टेंबर, 01433पनवेल-सावंतवाडी 18 सप्टेंबर, 01434 सावंतवाडी-पनवेल 18 सप्टेंबर, 01435 पनवेल-सावंतवाडी 19 सप्टेंबर, 01436 सावंतवाडी-पनवेल, 01449 पनवेल-रत्नागिरी 22 सप्टेंबर, 01450 रत्नागिरी-पुणे 23 सप्टेंबर, 01421 पुणे-झाराप 17 सप्टेंबर, 01422 झाराप-पुणे 18 सप्टेंबर, 01095 एलटीटी-सावंतवाडी 18 सप्टेंबर, सावंतवाडी-एलटीटी 19 सप्टेंबर, 01035 पनवेल-सावंतवाडी दैनिक विशेष 6 सप्टेंबर, 01036 सावंतवाडी-सीएसएमटी दैनिक विशेष 6 सप्टेंबर, 01033 सीएसएमटी-रत्नागिरी दैनिक विशेष 16 सप्टेंबर व 01034 रत्नागिरी-पनवेल दैनिक विशेष रेल्वेची 16 सप्टेंबर रोजी एक अतिरिक्त फेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व रेल्वेचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. अधिकाधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.