|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » बाजारातील घसरणीचे सत्र सरुच

बाजारातील घसरणीचे सत्र सरुच 

सेन्सेक्स 155 अंकानी तुटला तर निफ्टी 11,550 च्या खाली

वृत्तसंस्था/ मुंबई

मुंबई शेअर बाजारात मंगळवारी  घरणीचे सत्र दिवसभरासाठी चालूच राहिल्याचे चित्र होते. व्यवहारामध्ये सेन्सेक्स 155 अंकाच्या घसरणीसह बंद झाला, तर निफ्टी 11,550 अंकाच्या घसरणीसह बंद झाली आहे. भारतीय चलनामध्ये  होत असणाऱया घसरणीचे सत्र  बंद होण्याएवेजी ते वाढतच आहे.  या वातावरणाचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले.

  मिडकॅपच्या शेअर्सची विक्री थोडय़ाफार प्रमाणात झाल्याचे  पहावयास मिळाले.   मिडकॅपचा निर्देशांक 500 अंकानी कमजोर होत बंद झाला आहे. बाजारात घसरणीचे सत्र चालू असतानाच मिडकॅपच्या समभागातील घसरणीत प्रथम क्रमाकावर लागला होता. तर बँकांच्या समभागांची खरेदी विप्रीत एकूणच दबावाचे चित्र दिसून राहिले आहे.

बँकिगचे समभाग दबावात असतनाच यातील बँक निफ्टीने 400 अंकाची घसरणीचा टप्पा गाठत  बंद झाले आहेत. काही कंपन्या बाजारात घसरल्या असतना टीसीएस कंपनीने शेअर बाजारात नवा  विक्रम नोंदवला आहे. यात भारतातील दुसऱया क्रमाकांची मार्केट मुल्ये असणारी टीसीएस कंपनी ठरली आहे. भारतीय चलनानूसार 8 लाख कोटी बाजार किमत असणारी कंपनी ठरली आहे. टीसीएसच्या समभागाची 2 हजार 94 रुपया पर्यत विक्री झाली आहे.  या  विक्रीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला चांगलीच टक्कर दिल्याचे दिसून आले.

 अल्ट्राटेक सिमेंट , बजाज फायनान्स , फिनसर्व आयशर मोटर्स , आणि हीरोमोटो या कंपन्याच्या समभागामध्ये सर्वात मोठी घसरण झाल्याचे पहावयास मिळाले आहे. तर दुसरीकडे बजाज फायनान्स आणि इन्फोसिस यांच्या समभागात समाधानकारक वाढ दिसून आली.

बीएसईच्या मुख्य 30 शेअर्सचा निर्देशांक 154.60 म्हणजे 0.40 टक्के घसरणीसह 38,157 वर बंद झाला आहे. तर एनएसईच्या 50 मुख्य समभागातील निर्देशांक 62.05 अंकानी कमोजर होत 11,520.30 अंकाची नोंद होत बाजार बंद झाला.

Related posts: