|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापसा अर्बनच्या संचालकांचे राजीनामे

म्हापसा अर्बनच्या संचालकांचे राजीनामे 

प्रतिनिधी / म्हापसा

म्हापसा अर्बन को. ऑप. बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्याने बँकेच्या संचालक मंडळाने मंगळवारी केंद्रीय रजिस्ट्रार, सरकारी रजिस्ट्रार, सरकार व आरबीआयला राजीनामा सादर केला. बँकेचा विकास होऊ शकत नसल्याकारणाने सर्वांनी एकमतांने आपले राजीनामे सादर केले आहेत, अशी माहिती चेअरमन गुरुदास नाटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 दरम्यान मंगळवारी संध्याकाळी 6 वा. बँकेच्या कामगारांनी एकत्रित येऊन  संचालक मंडळ, अधिकारीवर्ग, व कामगार युनियन यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नाटेकर वगळता कुणीच हजर राहिले नसल्याने कामगारवर्ग संतप्त झाला. हा संताप त्यांनी गुरुदास नाटेकर यांच्यावर काढीत बैठकीत प्रश्नांचा भडिमार केला. अखेर नाटकेर यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.

बँक कर्मचाऱयांना आज पगार

बँकेच्या सर्व कर्मचाऱयांना बुधवारी पगार देण्यात येणार आहे. सर्वांचा पगार बँकेत यापूर्वीच जमा झालेला आहे. मात्र आरबीआयच्या निर्बंधामुळे त्यांना तो काढता येत नव्हता. हे कारण पुढे करून कामगारांनी सरव्यवस्थापक शैलेश सावंत यांच्याकडे बोलून कर्मचारीवर्गाला पगार देण्यास आरबीआयकडून परवानगी मिळविली. त्यानुसार बुधवारी सकाळी एका स्पॉफ्टवेअरद्वारे कर्मचारीवर्गाला पगार देण्यात येणार आहे. ही जबाबदारी खुद्द सरव्यववस्थापक सावंत यांनी स्वीकारली आहे, अशी माहिती नाटेकर यांनी दिली.

सरकारी नोकरदारांना वगळलs

या पगारातून इतर सरकारी कर्मचाऱयांना वगळण्यात आले आहे. त्यांचा पगार देण्यास आरबीआयने परवानगी दिलेली नाही, असे नाटेकर यांनी सांगितले. राजीनाम्याबाबत अधिक बोलताना, आम्ही सर्व संचालकांच्या सहय़ा घेतल्या आहेत. त्यानुसार आम्ही एकत्रित आमच्या पदाचे राजीनामे सादर केले आहेत, असे सांगितले.

न्यायालयात दाखल झालेली तक्रार मागे का घेण्यात आली, असा प्रश्न पत्रकारांनी नाटेकर यांना केला असता, पुढे काहीच सरकारत्मक दिसत नव्हते. न्यायालयात धाव घेऊन बँकेचे काहीच होणार नाही. निर्बंधावर स्थगिती घातली होती ती मागे घेण्यात आली. त्यात आरबीआयने पुन्हा बँकेवर निर्बंध घातले आहेत. निर्बंध लावण्यापूर्वी आरबीआयने आम्हाला मार्गदर्शक तत्वे द्यायला पाहिजे होती, असे नाटेकर म्हणाले. बैठकीला सर्व संचालक यायला हवे होते. परंतु ते आले नाहीत. मी दिलेला शब्द पाळला व बैठकीला उपस्थित राहिलो, असे त्यांनी सांगितले.

आता चेंडू सरकारच्या कोर्टात : सुभाष नाईक

बँकेच्या सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे. आता बँकेवर प्रशासक नेमावा की बँकेचे विलिनीकरण करावे हा निर्णय सरकारचा आहे. कायद्यानुसार सरकारला आपली पावले उचलावी लागतील. बँकेच्या भवितव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे, असे म्हापसा अर्बन बँक कामगार युनियनचे अध्यक्ष सुभाष नाईक जॉर्ज म्हणाले.

संपाला तयार रहा

आरबीआयने यापूर्वी गुजरातमध्ये अशाच प्रकारे बँकेचा परवाना रद्द केला होता. म्हापसा अर्बन बँक चालवण्यास योग्य नसल्याचे कारण करून ती बंदही करु शकतात. याला युनियनचा विरोध असेल. गरज भासल्यास सर्वांनी आपल्या हक्कासाठी लाढा द्यायला पाहिजे. तसेच संप, मोर्चा काढण्यास तयार रहायला पाहिजे, असे नाईक यांनी कर्मचाऱयांना सांगितले.

दरम्यान बैठक सुरु होण्यापूर्वी बँकेचे व्यवस्थापक शैलेश सावंत यांनी पत्रकारांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला. यावर काही कर्मचाऱयांनी आवाज उठवित पत्रकारांना आतमध्ये का नको, तुमचे कारनामे उघड होऊ द्या. अखेर बैठकीला सुरुवात होताच कामगारवर्गाने बँकेचे चेअरमन नाटेकर यांना धारेवर धरले.

संचालक मंडळाने सेटलमेंट करून पैसे हडप केल्याचा आरोप करीत कर्मचाऱयांनी अनेक प्रश्नांचा भडिमार केला. पगार न मिळाल्यास सर्व कर्मचारी अध्यक्षांच्या घरी ठाण मांडून बसणार असा इशारा यावेळी दिला. बँकेने कर्मचाऱयांना ग्रॅच्युटी सुद्धा  जमा केलेली नाही, असा आरोप कर्मचाऱयांनी केला. यावर आपण काहीच करू शकत नाही, आपल्याला काहीच अधिकार नाही, असे सांगून नाटेकर गप्पच राहिले.

Related posts: