|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » प्रशांत परिचालकांच्या वेतनासंदर्भात विधानपरिषदेत गटनेत्यांची बैठक

प्रशांत परिचालकांच्या वेतनासंदर्भात विधानपरिषदेत गटनेत्यांची बैठक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सैनिकांच्या पत्नींसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱया आमदार प्रशांत परिचारक यांच्या वेतनासंदर्भात विधानपरिषद गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय होणार आहे. यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानभवनात दुपारी 3 वाजता बैठक बोलावली आहे.

आक्षेपार्ह विधानानंतर भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारकांना मार्च 2017 च्या अधिवेशनात दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यांचे सदस्यत्व रद्द केले नसल्याने त्यांना निलंबन भत्ता देण्याबाबत आज बैठकीत चर्चा होणार आहे. ‘पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसेच आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य प्रशांत परिचारक यांनी केले होते.

Related posts: