|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » पतंगराव कदम व्याख्यानमालेचे न्या. दीपक मिश्रांच्या हस्ते उद्घाटन

पतंगराव कदम व्याख्यानमालेचे न्या. दीपक मिश्रांच्या हस्ते उद्घाटन 

ऑनलाईन टीम / पुणे

भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारती विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय यांच्या वतीने ‘डॉ पतंगराव कदम प्रबोधन व्याख्यानमाले’चा प्रारंभ येत्या शनिवारी सकाळी 8.30 वाजता भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुल येथे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती न्यू लॉ कॉलेजचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. मुकुंद सारडा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प ‘घटनात्मक अधिकाराचे संतुलन’ या विषयावर न्या. मिश्रा बोलणार आहेत. याप्रसंगी न्यू लॉ कॉलेज, पुणे लॉ सेंटर विस्तारित कक्ष दोन आणि आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय खानविलकर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांसह विविध न्यायालयांचे न्यायमूर्ती, उपस्थित राहणार आहेत. भारती विद्यापीठाच्या धनकवडी येथील शैक्षणिक संकुलामध्ये जानेवारी 2019 पासून सुरू होणारे हे आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र, अमेरिका, इंग्लंड, तसेच युरोपस्थित ख्यातकीर्त न्याय व कायदा क्षेत्रातील संस्था, तसेच मानांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठे यांच्या सहकार्यातून सुरू होत आहे.

Related posts: