|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » ‘स्व-रूपवर्धिनी’चे यंदा गणेशोत्सवात ‘टाळ पथक’ समाजोपयोगी, लोकोपयोगी उपक्रमांचाही समावेश

‘स्व-रूपवर्धिनी’चे यंदा गणेशोत्सवात ‘टाळ पथक’ समाजोपयोगी, लोकोपयोगी उपक्रमांचाही समावेश 

 

ऑनलाईन टीम / पुणे

पुण्यात 37 वर्षे आपल्या आगळ्या उपक्रमांचा ठसा उमटविणाऱया ‘स्व-रूपवर्धिनी’ संस्थेतर्फे यंदाही गणेशोत्सवात वेगळेपण जपण्यात येणार आहे. यंदाच्या मिरवणूकीत ढोलताशांच्या तालावर स्व-रूपवर्धिनीचे ‘टाळ पथक’ नूतन वैशिष्टय़ ठरणार आहे. याचबरोबर विविध समाजोपयोगी आणि जनजागृतीपण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

‘आता प्रवास पावित्र्याकडे’ या स्लोगनाद्वारे गणेशोत्सवात जनजागृती करण्यात येणार आहे. याचबरोबर ‘श्रमिकांचा गणपती’ ही गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येणारी संकल्पना यंदाही राबविण्यात येणार आहे. यामध्ये कष्टकरी व कामगार वर्गातील लोकांच्या हस्ते गणपतीची आरती केली जाते. तसेच झांज, घुंगुरकाठी, लेझीम, ध्वज, टिपऱया आदी पथकांचा मिरवणूकीतून सहभाग असणार आहे. या पथकांमध्ये सुमारे 500 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच पथनाटय़ या उपक्रमाद्वारेही गणेशोत्सवामध्ये जनजागृतीचा अजेंडा राबविण्यात येणार आहे. या पथनाटय़ उपक्रमात 250 विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या एकूण 11 ग्रुप्सचा असणार आहेत. यामध्ये मुलांच्याही ग्रुपचा समावेश यावर्षी करण्यात आला आहे. बालगुन्हेगारी, युवक कसा असावा, पर्यावरण, सजग नागरिक, वस्तीतील समस्या, व्यसने-स्वच्छता-वाहतूक समस्या या विषयांवर शहरातील 250 गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी पथनाटय़ सादर होणार आहेत. स्व-रूपवर्धिनीच्या ढोलताशा पथकांतील 100 पेक्षा अधिक वादक केवळ ढोल-ताशा वादन न करता 100 पेक्षा रक्तदान करणार असल्याची माहिती कार्यवाह ज्ञानेश पुरंदरे, गणेशोत्सव प्रमुख प्रशांत तांबे यांनी दिली.

Related posts: