|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे विविध कार्यक्रम

राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे विविध कार्यक्रम 

ऑनलाईन टीम / पुणे

भारतरत्न एम. विश्वेश्वरैय्या यांच्या स्मरणार्थ साजरा होणार्‍या राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनीअर्स डेव्हलपमेंट (एसीईडी) संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘एसीईडी’चे संस्थापक सदस्य प्रकाश भट, चेअरमन अशोक रेटवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार, 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता कमिन्स सभागृह, पत्रकारभवन, नवी पेठ, पुणे येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, पुणे महापालिकेतील पंतप्रधान आवास योजना विभागाचे सहसंचालक दिनेश रोकडे उपस्थित राहणार आहेत. 
राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे ‘हाऊसिंग फॉर ऑल’ आणि ‘कन्स्ट्रक्शन सेक्टर स्टार्टअप’ या विषयावर पेपर प्रेझेंटेशन आणि इनोव्हेटिव्ह आयडिया या दोन स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2018 आहे. दोन्ही स्पर्धांमधील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे रुपये 50 हजार आणि 25 हजारांचे रोख पारितोषिक असणार आहे. दोन्ही स्पर्धांचे पारितोषिक वितरण 29 सप्टेंबर 2018 रोजी होणार आहे