|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तर अन् दक्षिण कोरियाचे प्रमुख पुन्हा भेटणार

उत्तर अन् दक्षिण कोरियाचे प्रमुख पुन्हा भेटणार 

सेऊल / वृत्तसंस्था :

उत्तर कोरियाच्या नेतृत्वासोबत 18-20 सप्टेंबर या कालावधीत प्योंगयांगमध्ये शिखर परिषद होणार असल्याची माहिती दक्षिण कोरियाने गुरुवारी दिली आहे. याचदरम्यान उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग-उन यांनी उपखंडात आण्विक निशस्त्राrकरणाबद्दल स्वतःची प्रतिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

दोन्ही देशांच्या नेत्यांदरम्यान ही तिसरी आंतर-कोरियाई शिखर परिषद होणार आहे. दोन्ही नेते उत्तर कोरियाच्या राजधानीत भेटतील आणि आण्विक निशस्त्राr करणाच्या व्यवहार्य पावलांबद्दल चर्चा करतील अशी माहिती दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चुंग युई-येंग यांनी दिली आहे.

दोन्ही देशांच्या नेत्यांदरम्यान या अगोदर 27 एप्रिल आणि त्यानंतर 26 मे रोजी चर्चा झाली होती. आण्विक निशस्त्राrकरणाच्या दिशेने पुरेशी पावले न उचलल्याचा दाखला देत अमेरिकेने विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांचा उत्तर कोरिया दौरा रद्द केला होता.