|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यापुढे निवडणूक लढविणार नाही

यापुढे निवडणूक लढविणार नाही 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

आपण भविष्यात कोणतीही निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा गुरूवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. येथे गणराया ऍवॉर्ड वितरण सोहळय़ात ते बोलत होते. त्यांच्या ‘निवडणूक’ संन्यासाच्या घोषणमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

   गतवर्षी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी ठोस भूमिका घेतली होती. डॉल्बीचे परिणाम याविषयी जागृती करताना डॉल्बीमुक्त गणेशोत्सव उपक्रम राबविला. त्याला शहरातील गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. केवळ 16 मंडळांनी विसर्जन मिरवणूकीमध्ये साउंड सिस्टीमचा वापर केला होता. या मंडळांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल झालेल्या मंडळांची बाजू कोल्हापूर उत्तरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनासमोर मांडली होती. यावरून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये राजकीय सामना रंगला होता. मंत्री पाटील व आमदार क्षीरसागर यांच्यात शाब्दिक टोलबाजीबरोबर जहाल टीकाटिप्प्पनीही झाली होती. दोघांतील वाद चर्चेचा विषय ठरला. यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या एका कार्यक्रमात आमदार क्षीरसागर यांनी आपला सिलेक्टेड नाही तर इलेक्टेड असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरची जनता दादा घोसाळकर करेल, असा टोल लागावला होता.

Related posts: