|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यशस्वी होण्यासाठी अहंकार सोडा

यशस्वी होण्यासाठी अहंकार सोडा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

राग, द्वेष करुन आजपर्यंत कोणाचेही चांगले झालेले नाही. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी अहंकार सोडला पाहिजे, असे प्रतिपादन त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डी.वाय.पाटील यांनी केले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह येथील महापालिका शिक्षण समितीच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रसंगी ते बोलत होते. महापौर शोभा बोंद्रे अध्यक्षस्थानी होत्या.

डी.वाय. पाटील म्हणाले, अपघाताने कुठलीही गोष्ठ होत नाही. आपली इच्छा शक्ती असल्यास सर्व काही होणे शक्य आहे. आपले राज्यपाल होण्याचे ध्येय होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी यांच्यामुळे हे शक्य झाले. ध्येय गाटण्यासाठी सातत्याने पाठलाग केला पाहिजे.

प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव म्हणाले, प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने महापालिका, खासगी अनुदानित प्राथमिक शाळांकडील चांगली कामगिरी करणाऱया शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, विशेष व शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार करण्यात येतो. यंदाही अशा पद्धतीने पुरस्कार देण्यात येत आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये 10 हजार पेक्षा जास्त विद्याथी आहेत. 500 शिक्षक असून समितीच्या मालकीच्या 75 इमारती आहेत. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मनपा शाळांकडे नेहमी लक्ष असते. शाळा तेथे ग्रंथालय, शाळा तेथे प्रयोगशाळा करण्याचा त्यांचा मानस आहे. महापालिकेच्या शाळेतील 24 विद्यार्थी राज्यपातळीवर चमकले आहेत. पटसंख्या कमी आहे म्हणून एकही शाळा बंद झालेली नाही. किंबहुना काही शाळा खासगी शाळांना लाजवेल असे काम करत आहेत.

  यावेळी महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी शाळांच प्रगतीचा आढावा घेतला. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले युवराज सरनाईक सुप्रिया देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.महापालिका शाळांतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील स्वाती लंगडे,  विचारे विद्यालयातील विष्णू परीट, वि.स. खांडेकर विद्यालयातील चारुशिला बिडवे, वीर कक्कय विद्यालयातील युवराज सरनाईक, जरग विद्यालयातील शैलजा पाटील      यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित केले. खासगी अनुदानित शाळांतर्गत  शैलाजी वन्नाजी विद्यालयातील सुप्रिया देशपांडे (मुख्याध्यापिका), तेजस मुक्त विद्यालयातील संगिता साळोखे, दि मॉडर्न स्कूलच्या गिरीजा जोशी, सन्मित्र विद्यालयातील शिवाजी वसंत भोसले (मुख्याध्यपक), शैलाजी वन्नाजी विद्यालय सुनिता हंकारे यांना आदर्श पुरस्कार देण्यात आला. तसेच मोहन हांडे, नामदेव जाधव यांना आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देण्यात आले.  यावेळी शिक्षण समिती सदस्य छाया पोवार, मेहजबीन सुभेदार, श्रावण फडतारे आदी उपस्थित होते.

अंतर्गत कुरघोडी बंद करा : सदस्या रुपाराणी निकम

चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी सक्षम शिक्षक असले पाहिजेत. जुन्या काळातील शिक्षक शिस्तप्रिय होते. आता हे दिसून येत नाही. मनपा शाळेंची पाहणी केली असता अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याचे आढळून आल्या. यामुळे शाळांवर परिणाम होत आहे. विद्याथी-शिक्षकांमधील अंतर कमी झाले पाहिजे. सतत संवाद ठेवला पाहिजे. सर्वच शिक्षकांचे चुकते असे नाही. शिक्षकांचेही काही प्रश्न आहेत. ते आम्हाला सांगा सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे सदस्या रुपाराणी निकम यांनी सांगितले.

महापौर बोंद्रे आमदार तर जाधव उपमहापौर होतील

बोंद्रे घरण्याशी आपले चांगले संबध आहेत. माजी आमदार दिवंगत श्रीपतराव बेंद्रे यांच्याशी नेहमी संवाद होत होता. शोभा बोंद्रे महापौरपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभळत आह. आज त्या महापौर आहेत, पुढील काळात आमदारही होतील, असे डी.वाय. पाटील यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षक समिती सभापती अशोक जाधव यांनी डी.वाय. पाटील यांचा आपण मानसपुत्र आहे. त्यांची इच्छा आपण महापौर व्हावी ही असल्याचे सांगितले. हाच धागा पकडत डी.वाय. पाटील म्हणाले, मनपाच्या सध्याच्या सभागृहात अशोक जाधव महापौर जरी होवू शकणार नसले तरी ते उपमहापौर मात्र, नक्कीच होतील.            

Related posts: