|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News »  भाजपाची कमान अमित शहांकडेच

 भाजपाची कमान अमित शहांकडेच 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल ’मिशन 2019’साठी वाढण्यात आला आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आगामी लोकसभा निवडणूक अमित शहा यांच्या नेतृत्त्वातच लढली जाईल हे स्पष्ट झाले आहे. जानेवारी 2019मध्ये शहा यांचा कार्यकाल संपणार होता. लोकसभा निवडणुकीनंतरच भाजपच्या संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

2019ची लोकसभा निवडणूक मार्च किंवा एप्रिलमध्ये होण्याची शक्मयता आहे. हे लक्षात घेत भाजपने नव्या टीमसह निवडणुकीला सामोरे जायचे नाही असे ठरवले आहे. आज घेतलेल्या निर्णयानुसार अनुभवी जुनीच टीम निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसणार आहे. आज सकाळी भाजपच्या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली. या बैठकीचे उद्घाटन पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केले. आपल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने जगातील सर्वात लोकप्रिय नेता असून भाजप आगामी निवडणूक बहुमताने जिकणार असल्याचा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. आपल्या संकल्पशक्तीला कुणीही पराभूत करू शकणार नाही, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत ’अजेय भाजप’ची घोषणा करण्यात आली. बैठकीत भाजपच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱयांसह सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्षही उपस्थित आहेत. बैठकीच्या उद्घाटनाच्या सत्रात 5 राज्यांमधील निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणण्याचा संकल्प करण्यात आला. विशेषतः तेलंगण राज्यात पक्षाने उत्तम कामगिरी करावी यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.

 

Related posts: