|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » ‘काँग्रेस’च्या ‘भारत बंद’ला ‘मनसे’चा पाठिंबा

‘काँग्रेस’च्या ‘भारत बंद’ला ‘मनसे’चा पाठिंबा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशभरातील इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसने उद्या 10 सष्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. मनसे उद्या पूर्णपणे या बंदमध्ये सहभागी होणार आहे.

१० सप्टेंबर २०१८ रोजी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील 'भारत बंद' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा आणि सक्रिय सहभाग.

Posted by Raj Thackeray on Saturday, September 8, 2018

मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ‘भारत बंद’ला पाठिंबा देतील. मात्र कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन मनसेतर्फे देण्यात आले आहे. मुंबईतून बाहेरगावी जाणाऱयांनी उद्या संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बाहेर पडावे, असे आवाहन मनसेने केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून या प्रकाराचे आदेश दिले आहेत. मनसे पदाधिकाऱयांच्या बैठकीत ‘भारत बंद’ला समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱयांनी या बैठकीला हजेरी लावली होती. देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे काँग्रेसने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट या प्रश्नांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात हल्लाबोल चढवला. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत ‘भारत बंद’ ठेवण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.