|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » भारत बंद : मनसेकडून ‘अच्छे दिन’ची शवयात्रा ; 55 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

भारत बंद : मनसेकडून ‘अच्छे दिन’ची शवयात्रा ; 55 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह 25 राजकीय पक्षांनी आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. या आंदोलनाला मुंबई शहरासह अनेक ठिकाणी समिश्र प्रतिसाद मिळत आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दादरमध्ये शिवसेना भवन परिसरात ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जवळपास 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

दुसरीकडे, चेंबूरमधील वाशी नाका परिसरात काही कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान बेस्टच्या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. तसेच, प्रतिक्षानगर बस डेपोमध्ये सुद्धा काही बसची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या घटनेत बसच्या काचा फुटल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. याशिवाय, चेंबूरमध्ये आंदोलन करणाऱया आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, चेंबूर नाका येथे डायमंड पेट्रोल पंपावर मनसेने अनोखे आंदोलन केले. यावेळी मनसेने पेट्रोलपंपावर गाढव आणले आणि आंदोलन केले.