|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » झुकानेवाल्यांची दुनिया-1

झुकानेवाल्यांची दुनिया-1 

जगभर आज भविष्य सांगण्याचा धंदा जोरात आहे. वैयक्तिक भविष्ये तर आजकाल संगणकाच्या साहाय्याने पत्रिका तयार करून तुमच्या आयुष्याबद्दल संगणक भाकित करू लागले आहेत. पण याशिवाय आणखी ठोक प्रकारचे भविष्यवेत्ते दुसऱया महायुद्धानंतर उदयास आले. त्यांना पाश्चिमात्य देशात ‘सीअर्स’ म्हणजे ‘दैवी देणगीनं अदृष्टात पाहणारे’ असं म्हटलं जातं. पहिल्यांदा या मंडळींनी हिटलरला दुसरं महायुद्ध चालू असताना ‘मामा’ बनवलं आणि दुसऱया महायुद्धानंतरच्या काळात अशाच काही लोकांनी जगाला ‘मामा’ बनवलं. अमेरिकेत गाजलेल्या अशा अंतर्ज्ञानी व्यक्तींच्या भविष्यवाणीच्या या हकिकती वाचून  आज आपली नक्कीच करमणूक होईल.

बर्टी कॅचिंग्ज नावाची एक स्त्राr 1969 मध्ये टेक्सास या अमेरिकी राज्यात उदयास आली. तिच्या भविष्यवाणीचे हे नमुने बघा. 1982-83 मध्ये लिबिया फ्रान्स आणि आफ्रिकेमधील इंग्रजी भाषिक राष्ट्रांपुढे लष्करी आव्हान उभे करील. सोविएत रशियानं पुरवलेल्या शस्त्रांनी तो अनेक देशांवर आक्रमण करील. या राष्ट्राचा नेता  मुअम्मर अल् कद्दाफी याच्या आक्रमक महत्त्वाकांक्षेमुळं आफ्रिका खंडातल्या सहाराच्या दोन्ही बाजूस युद्धाचा वणवा उफाळेल. प्रत्यक्षात असं काहीसुद्धा घडलं नाही. लिबियामुळे आफ्रिका खंड पेटलेलं असतानाच अर्जेंटिना आणि चिली यांच्यात दक्षिण अमेरिका खंडाच्या आजुबाजूला असलेल्या बेटांवरून युद्ध सुरू होईल. त्यात पेरू आणि बोलिव्हिया अर्जेंटिनाची बाजू घेतील. हेही प्रत्यक्षात घडलं नाहीच.

1984 मध्ये एक अफलातून वैज्ञानिक शोध लागेल. त्यामुळे विजेचं अति वारं वादळेच्या चुंबकीय बलात रूपांतर करणे शक्य होईल. यामुळे जवळजवळ  प्रकाशाच्या वेगाने अवकाश प्रवास शक्य होईल. 1985 मध्ये मोटारीच तुम्हाला इच्छित स्थळी सोडू लागतील. अजून आपण चंद्रावरसुद्धा वसाहत केलेली नाही. 1990 मध्ये उत्तर  ध्रुवीय वर्तुळाजवळ एका अज्ञात जमातीचा शोध लागेल.  या जमातीतील लोकांना उत्तर ध्रुवीय बर्फाखालून पृथ्वीच्या पोटात जाणारा एक मार्ग सापडेल. या भू कवचाखालील जगात ही जमात गेली काही हजार वर्षे जगत असून, त्यांच्या बागांमध्ये अद्भभूत फळं आणि फुले आहेत, हे लक्षात आल्यावर जग थक्क होईल. याचं काय झालं ते आपल्याला माहितीच आहे. 1992 मध्ये शिकागो आणि डल्लास या दोन शहरांदरम्यान भूमिगत रेल्वे सेवा सुरू होईल. हे अजून तरी घडलेलं नाही. ऍल्युशियन बेटांमधील ऍडाक नावाच्या बेटावर सोन्यानं भरलेली एक गुहा एका मुलाला सापडेल. हे सोनं मीच दोन जन्मापूर्वी या गुहेत ठेवलं, असं तो म्हणेल. हे त्या बेटावरच काय पण पृथ्वीवर कुठेच अजून घडलेलं नाही. सर्व महत्त्वाच्या शहरांवर सौर उर्जेचं मायक्रोवेव्ह उर्जेत रूपांतर करणारे
उपग्रह स्थिर केले जातील.

या मायक्रोवेव्ह उर्जेचं नेहमीच्या वापरातसुद्धा विद्युत उर्जेत रूपांतर केलं जाईल. ही कल्पना तशी जुनी आहे. पण प्रत्यक्षात आणण्यात बऱयाच अडचणी आहेत. 1995 सालासाठीचं जे भविष्य आहे, ते तर अफलातूनच आहे. पृथ्वीवरचे खाण कामगार लोह, निकेल, शिसं, कोबाल्ट आणि इतर धातूंच्या शोधात चंद्र, मंगळ आणि काही लघुग्रहांवर पोहोचतील. तिथे त्यांना आधीच्या परग्रहवासी खाणकामगारांनी मागं ठेवलेली अवजारं आणि खाण कामाचं साहित्य सापडेल. यावर आपण काय बोलणार? 1995 सालासाठीचं पुढचं भविष्य बघा. सध्या अस्तित्वात नसलेलं एक संकरीत वनस्पती वाण अस्तित्वात येईल, त्याचं पीक सागरात घेता येईल. त्यात खूप पोषक घटक आणि जीवनसत्वं असतील. पृथ्वीभर ते लोकप्रिय होईल.

या धान्यामुळं जगाची अन्न समस्या सुटेल. हे वाढविण्यासाठी अलास आणि सोविएत युनियन दरम्यान एक धरण बांधलं जाईल. 1995 मध्ये सोव्हिएत युनियनचं केव्हाच विघटन झालेलं होतं.

1996 मध्ये दक्षिण कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात त्यांनी भरलेलं एक प्राचीन जहाज सापडेल. अजून म्हणजे 22 वर्षे लोटली तरी असं काही घडलेलं नाही. इ. स. 2000 येऊन गेलं. त्याला अठरा वर्षे होऊन गेली तरी बर्टी कॅचिंग्जनं सांगितल्याप्रमाणं माणसं 150 वर्षे जगू लागलेली नाहीत.

उलट इच्छामरणाचा कायदा करावा, त्यासाठीच्या चळवळी वाढू लागल्या आहेत. आणि बऱयाच देशात असे कायदे होतील अशी चिन्हे आहेत. बर्टीच्या मते यावेळी 20 टक्के रोगांवर औषधं मिळू लागलेली असतील आणि पुढच्या दहा वर्षात एकही रोग असाध्य असणार नाही. याबद्दल काय बोलावं? कर्करोग, मधुमेह, क्षय आणि डासजन्य आजार सर्वत्र वाढताना दिसत आहेत. हिवतापावर अजूनही खात्रीशीर लस सापडलेली नाही.

अटलांटिक महासागरात अनेक शहरे वसवली जातील, त्यामुळे चालत चालत अटलांटिक महासागर ओलांडणं शक्य होईल. कारण ही शहरे एकमेकांना जोडलेली असतील. प्रत्येक मुलाच्या मनगटात एक पट्टा असेल. त्यामुळे कुठल्याही वेळी ते मुल कुठे आहे, हे त्याच्या पालकांना सांगता येईल. यामुळे मुलं हरवणे, चोरीला जाणे या घटना घडू शकणर नाहीत. अवकाशात शहरं निर्माण करून तिथं वसाहती निर्माण करण्यात येतील. या शहरांना कुठल्याही बाबतीत पृथ्वीवर अवलंबून राहावं लागणार नाही. चंद्रावरच्या खाणींमधून त्यांना हवा तेवढा कच्चा माल आणता येईल. बर्टीच्या अशा बऱयाच भविष्यवाणी वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातल्या वानगीदाखल काही इथं दिल्या आहेत. आता तिच्या सारख्याच इतरांच्या भविष्यवाण्या बघायच्या असल्यानं तिचा इथंच निरोप घेऊ या.

डेनिस काँकीन हा कॅलिफोर्नियातील असाच एक द्रष्टा माणूस. त्यानं जगभरामधील  अनेक बाबींसंबंधी वेळोवेळी भविष्य कथन केलं. ते आता आपण बघणार आहोत. त्याच्या भाकितानुसार 1982 मध्ये चीनमध्ये एक स्त्राr सत्तेच्या शिखराच्या दिशेने झपाटय़ानं वाटचाल करू लागेल. चीनच्या परराष्ट्र धोरणावर तिचा प्रभाव पडेल. ती चीनला महासत्ता बनवून जागतिक राजकारणावर प्रभाव पाडेल.

आजमितीस चीनमध्ये कुठल्याही स्त्राrनं 1982 च काय पण 2012 तही असं काही केले नाही. आजही चीनमध्ये कुठलीही स्त्राr चीनच्या सत्ता शिखराच्या आसपासही  पोहोचू शकलेली नाही. चीन आणि  रशियात युद्ध सुरू होईल यात चीन रशियाचा पराभव करेल. या माणसानं फारशी आंतरराष्ट्रीय भाकितं केलेली नाहीत. त्याची बहुतेक भाकितं स्थानिक स्वरूपाची आहेत. त्याचा इथं विचार केलेला नाही.

(क्रमशः)

निरंजन घाटे   

 

 

Related posts: