|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्वीकृत नगरसेवकपदी इनामदार, कांबळे, सावर्डेकर, बारगीर, मेस्त्राr

स्वीकृत नगरसेवकपदी इनामदार, कांबळे, सावर्डेकर, बारगीर, मेस्त्राr 

प्रतिनिधी/ सांगली

महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी सोमवारच्या महासभेत पार पडल्या. भाजपाकडून शेखर इनामदार यांच्यासह खासदार गटाचे रणजित सावर्डेकर, आरपीआयचे विवेक कांबळे यांना संधी दिली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुस्लीम कार्ड काढत करीम मेस्त्राr, आयुब बारगीर यांना संधी दिली.

महापौर सौ. संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महासभा पार पडली. संख्याबळानुसार पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड सभेत करण्यात आली. यामध्ये भाजपाचे तीन तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका नगरसेवकाची निवड करण्यात आली. महासभेत तिन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी नावांचा बंद लिफाफा महापौर व आयुक्तांकडे दिला. महापौर खोत यांनी सदस्यांची नावे जाहीर केली. भाजपाकडून शहराध्यक्ष शेखर इनामदार यांचे नाव निश्चित झाले होते. तर उर्वरित दोन जागेसाठी विवेक कांबळे, रणजीत पाटील-सावर्डेकर, अशोक सूर्यवंशी, बाबासाहेब आळतेकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आरपीआयला संधी देण्याचे धोरण निश्चित केले. त्यांनी आरपीआयचे राज्य सचिव  विवेक कांबळे यांना संधी दिली. तर दुसरीकडे खासदार संजयकाका पाटील गटाला संधी देत रणजित पाटील-सावर्डेक यांची वर्णी लावली.

काँग्रेसकडून करीम मेस्त्राr, अकबर मोमीन, विशाल कलगुटगी, विजय पाटील आदींच्या नावाची चर्चा होती. मात्र महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लीम समाजाच्या तुलनेत काँग्रेसने त्यांच्या समाजातील कमी जणांना उमेदवारी दिली असल्याचा आरोप होत होता. त्यामुळे या समाजात नाराजी पसरली होती. लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने समाजाची नाराजी नको म्हणून काँग्रेसने मुस्लीम कार्ड ओपन करीम मेस्त्राr यांना संधी दिली. मेस्त्राr काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. त्यांनी अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम केले आहे. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली. राष्ट्रवादीकडून आयुब बारगीर व सागर घोडके, प्रा. पद्माकर जगदाळे, संजय बजाज यांच्या नावाची चर्चा होती. माजी मंत्री आमदार, जयंत पाटील यांनी आयुब बारगीर यांना संधी दिली.

 यावेळी स्थायी समितीच्या सोळा तर महिला व बालकल्याण समितीच्या सोळा सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. प्रत्येक समितीमध्ये भाजपचे नऊ, काँग्रेसचे चार तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. मागासवर्गीय व दलित वस्ती सुधार समितीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या अकरा जणांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला. यामध्ये भाजपचे सात, राष्ट्रवादीचे तीन तर कॉंग्रेसचा एक सदस्य आहे. जगन्नाथ ठोळके यांनी मागासवर्गीय व दलित वस्ती सुधार समितीचे नाव समाजकल्याण समिती असे करावे, अशी मागणी सभागृहात केली. तर योगेंद्र थोरात यांनी अनुसूचित जमातीच्या एकमेव सदस्या आहेत. त्यांना मागासवर्गीय समितीत घ्यावे, अशी मागणी केली. ठोकळे यांनी याला विरोध केला. मग अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेल्या स्वाती पारधी यांना स्वतंत्र कार्यालय द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली. आयुक्तांनी कायदेशीर बाबी पडताळून महिन्याभरात निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. 

खणभागात सात नगरसेवक

महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपाने रणजित पाटील-सावर्डेकर, काँग्रेसने करीम मेस्त्राr तर राष्ट्रवादीने आयुब बारगीर यांना संधी दिली. हे तिन्ही नगरसेवक सांगली येथील खणभागातील आहेत. तर खणभागातून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी महापौर हारूण शिकलगार तर भाजपाच्या सुनंदा राऊत, स्वाती शिंदे हे चार जण निवडून आले आहेत. त्यामुळे आता खणभागात नगरसेवकांची संख्या सात झाली आहे.

Related posts: