|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » महागाई विरोधात आयटकची निशर्दने

महागाई विरोधात आयटकची निशर्दने 

प्रतिनिधी/ पणजी

 भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली असून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सर्वसामान्यांना महागाईचा संकटात टाकले आहे. सध्या पेट्रोलच्या किंमती भरमसाठ वाढल्या असून याचा आम्ही निषेध करतो असे आयटकचे ख्रिस्तोफर फोन्सका यांनी सांगितले. आयटकतर्फे काल महागाईचा विरोधात पणजी क्रांती सर्कलकडे निदर्शने करण्यात आली.

 भाजप सरकार हे सर्वसामांन्याचे नसून भांडवलदारांचे आहे. मोदीजींनी महागाई कमी करणार असे आश्वासन दिले होते. पण महागाई कमी झाली नसून ती आगखी वाढली आहे. सध्या पेट्रोलचा तसेच इतर जीवनाआवश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहे.

 देशातील सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग मात्र या महागाईत भरडला जात आहे. याचे सरकारला काहीच पडले नसून सरकारकडून मात्र कोटीची राफेल सारखी डिल केली आहे. महागाई कमी करण्यात सरकारला अपयश आले आहे. सरकारने फक्त भांडवलदार बिल्डर व मोठ मोठय़ा कंपन्यांच्या मालकांना चांगले  दिवस आणले आहे. काळा पैसाही आणणार असे सांगून लोकांची फसवणूक केली अजूनही मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. याचा विरोध करण्यासाठी का आयटकचे कामगार नेत्यांनी  निदर्शने केली.

Related posts: