|Saturday, October 19, 2019
You are here: Home » उद्योग » सॅमसंगचे जगातील मोठे दालन सुरू

सॅमसंगचे जगातील मोठे दालन सुरू 

बेंगळुरमध्ये 3 हजार चौ. मी. परिसरात मोबाईल स्टोअरला प्रारंभ

वृत्तसंस्था/ बेंगळूर

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आपल्या जगातील सर्वात मोठय़ा मोबाईल दालनाला मंगळवारी प्रारंभ केला. सध्या चिनी स्मार्टफोन कंपन्यांकडून वाढती स्पर्धा पाहता जगातील दुसऱया स्मार्टफोन बाजारातील आपले स्थान मजबूत करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण कोरियन कंपनीने 33 हजार चौरस फूट म्हणजे 3 हजार चौरस मीटर परिसरात पसरलेले हे दालन बेंगळुरमध्ये सुरू केले आहे. देशातील प्रमुख 10 शहरांमध्ये अशी दालने सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे.

चिनी कंपन्यांसह ऍपल या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीबरोबर स्पर्धा करण्यास मदत होईल. चीन आणि अमेरिकेमध्ये स्मार्टफोन बाजारात वाढीच्या दृष्टीने मंदी आल्याने कंपनीने भारतावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. बेंगळुरातील या दालनात कंपनीच्या स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि नवीन उत्पादनांचा समावेश असेल. कंपनीकडून सर्व्हिस सेन्टरचीही सेवा पुरविण्यात येईल.

सध्या सॅमसंगची देशभरात 2,100 दालने असून ती प्रॅन्चाईजीच्या माध्यमातून चालविण्यात येतात. मात्र ऑफलाईन बाजारात आता शाओमीकडून विस्तार करण्यात येत असल्याने कंपनीला गुंतवणूक करावी लागत आहे.