|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महसूल कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

महसूल कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

खासबाग येथील महसूल भवनात शनिवार 8 सप्टें रोजी जिल्हा महसूल खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 73 वी वार्षिक सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अमर पाटील होते. संस्थेचे संचालक सर्जेराव जरग यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

   यावेळी संस्थेचे अध्यक्ष पाटील यांनी अहवाल वाचन केले. याप्रसंगी संस्थेचे दिवंगत सभासद, शहिद जवान, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व केरळमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली.  शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले सभासद विलास खोत, रमेश गुरव, सुनिल ब्रम्हपूरे, शोभा पाटील, कुमार कोळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खेळात व दहावी, बारावीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी अंतोन डिसोजा, शंकर गुरव, राजीव पाटील, राजन नाळे, अमित लाड, सुनिल देसाई, बाबूराव बोडके, शरद कामत, विद्या पठाडे, अश्विनी कारंडे, वर्षा पाटोळे आदी उपस्थित होते.