|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विसर्जन गोंधळाला पालिका जबाबदार

विसर्जन गोंधळाला पालिका जबाबदार 

प्रतिनिधी/ सातारा

गणेशोत्सवाला अवघे दोन दिवसांचाच कालावधी कमी राहिला आहे. साताऱयात अद्यापही गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग व स्थळे निश्चित केली गेली नाहीत. त्यामुळे जनतेत संभ्रम, असंतोष व अनिश्चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी विसर्जन मिरवणूक मार्ग व स्थळे याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, न घेतल्यास निर्णयाची व्यापक प्रसिध्दी देऊन नागरिकांमधील संभ्रमावस्था दूर करावी. आपण तात्काळ निर्णय जाहीर केला नाही, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी म्हणून जबाबदार धरले जाईल, अशी नोटीस सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बाजवल्याने पालिका प्रशासनाची मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळे निश्चित करण्यासाठी एकच भंबेरी उडाली आहे.

गणेशोत्साला कमी अवधी शिल्लक राहिला आहे. तरी पालिकेची काहीच तयारी दिसत नाही. साताऱयातील विर्सजनाचा प्रश्न चिघळल्यामुळे पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. पालिका मुख्याधिकारी गोरे यांना बजावलेल्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे की, सन 2015 मध्ये ऐतिहासिक मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव यामध्ये गणपती विसर्जन करू नये अशी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर उच्च न्यायालयाने या वरील तळ्यात विसर्जनास बंदी केली आहे. पालिकेने तेंव्हापासून प्रतापसिंह शेती फार्म, हुतात्मा स्मारक, दगडी शाळा सदरबझार, आण्णासाहेब कल्याणी विद्यालय परीसरात कृत्रिम तळी निर्माण करून विसर्जनाचा प्रश्न मार्गी लावला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्यावतीने गणेश मंडळ पदाधिकारी व शांतता कमिटीच्या बैठका घेतल्या होत्या. त्या बैठकांमध्ये पालिकेने मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळांबाबत भूमिका जाहीर न केल्यामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱयांनी नाराजी व्यक्त केली होती.

  गुरूवार 13 रोजी गणपतींचे आगमन होत आहे. काही दिड दिवसांचे तर घरगुती गणपती 3 ते 10 दिवसांचे असतात. पालिकेची कोणतीही पूर्वनियोजीत तयारी असल्याचे दिसून येत नाही. मिरवणुकीचे मार्ग निश्चित न झाल्यामुळे नागरीकांमध्ये संभ्रम व असंतोष निर्माण झाला आहे. पालिकेने मिरवणुकीचा व विसर्जन स्थळे कोणती निश्चित केली आहेत, याचा अहवाल पोलीस प्रशासनास तात्काळ पाठवावा. आपण तात्काळ निर्णय जाहीर केला नाहीतर आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार म्हणून पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांना धरण्यात येईल, असे नोटीसीव्दारे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पालिका प्रशासना बजाविल्याने पालिका प्रशासनाची आता चांगलीच भंबेरी उडाली आहे. शहरातील गणेश विसर्जन मार्ग आणि स्थळे निश्चित करण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे.

Related posts: