|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » नालासोपारा स्फोटक प्रकरणी जालण्यातून एकास अटक

नालासोपारा स्फोटक प्रकरणी जालण्यातून एकास अटक 

ऑनलाईन टीम / जालना :

नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने आणखी एका तरुणाला जालना येथून अटक केली आहे. गणेश कपाळे असे या तरुणाचे नाव असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.

एटीएसने आज सकाळी शिवमंदिर चौकातील गणेश कपाळेच्या दुकानावर छापा मारून त्याला अटक केली. त्याच्या दुकानातील हार्ड डिस्क, संगणकही ताब्यात घेतले असून संगणकातून काही पुरावे मिळतात का? याचा तपास करण्यात येणार आहे. या शिवाय कपाळेचा  समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी काही संबंध आहे का? याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जालन्यातून श्रीकांत पांगारकर याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे दाभोळकर हत्येमागे नालासोपारा, औरंगाबाद ते आता जालनापर्यंत कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.

Related posts: