|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा 

प्रतिनिधी/पणजी

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोव्यातील समस्त जनतेला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश म्हणजे ज्ञानाचे व बुद्धीचे दैवत. गणेश चतुर्थी सणामुळे राज्यातील लोकांमध्ये एकता आणि सामाजिक सलोखा मजबूत होतो. यंदाचा हा सण गोव्यातील लोकांना सुखसमाधान, शांतता आणि भरभराट घेऊन येवो, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

आपला परिसर स्वच्छ, प्लास्टिक आणि प्रदूषणमुक्त करूया आणि पर्यावरणास अनुकूल असा गणेश चतुर्थी उत्सव साजरा करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.