|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विविध पद्धतीने साजरी केली जाणारी गणेश चतुर्थी

विविध पद्धतीने साजरी केली जाणारी गणेश चतुर्थी 

नारायण गावस /  पणजी

 आज घरोघरी गणरायाचे पूजन केले जाणार असून लाडक्या गणरायाचे आगमनाने घराचे मंदीर होणार आहे. दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस नऊ दिवस व अकरा दिवस गणेशाचे पूजन केले जाणार आहे. महाराष्ट्र व गोव्यात हा उत्सव मोठय़ा  धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे.

 दिवाळी प्रमाणे गणेश चतुर्थीला हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. पूर्वी फक्त घराघरामध्ये पूजन केले जायचे. आता सार्वजनिक गणेशोत्सवाची भर पडली आहे. सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा केला जात आहे. आता विभक्त कुटूंब पद्धती असली तरी गाणरायाच्या निमित्ताने एकत्र येत असतात त्यामुळे घर आनंदाने फुलते.

  गणेश चतुर्थी साजरी करण्याचा अनेक प्रथा आहेत. गावा व प्रदेशानुसार पद्धत बदलत असतात. काही गावामध्ये गौरी पूजन पाचव्या किंवा सहाव्या दिवशी केले जाते. तरी काही गावामध्ये हौशाची परंपरा आहे. काही ठिकाणी महाजनांच्या हस्ते गणशाचे पहिल्या दिवशी पूजन केले जाते काही जण स्वतःहून पूजन करतात. तसेच माटोळीला जंगलातील विविध प्रकारची फळे फुले बांधण्याची पद्धत आहे. तर काही गावामध्ये नववधुच्या घरी माहेराहून ओझे (चतुर्थी निमित्त दिले जाणारे गोड पदार्थ व साहित्य) दिले जाते. सत्तरी काणकोण, फोंडा. डिचोली पेडणे अशा प्रत्येक तालूक्यामध्ये वेगवेगळय़ा प्रथा परंपरा आहेत.

गौरी पूजन परंपरा

 गोव्यात काही गावामध्ये गणपतीपुजना बरोबरच गौरी पूजनही केले जाते. चतुर्थी पाचव्या किंवा साहाव्या दिवशी गौरी पूजन केले जाते. घरातील सुहासिनी महिला झऱयावर किंवा तळय़ावर कलशातून पाणी आणतात. त्यात हळदीची पाच पाने नारळ ठेवला जातो. वाजत गाजत तो कलश गणपतीच्या मखराच्या शेजारी ठेवले जाते. त्यानंतर सुहासिनीकडून त्याची पूजा केली जाते. गाऱहाणे घातले जाते. सायंकाळी पुन्हा त्या कलशातील पाणी त्या नदावर ंिकवा तळय़ावर सोडले जाते. त्यानंतर भाजी भाकरी सगळय़ांना प्रसाद म्हणून वाटला जातो. सत्तरीतील बहुतेक गावामध्ये ही परंपरा आहे. गणपती प्रमाणे गौरी पूजनाला मोठे महत्व या गावामध्ये आहे.

हौशांचे वाटप

 सत्तरी डिचोली तसेच अन्य तालुक्यातील गावामध्ये गौरी पूजनानंतर हौशे सुहासिनी  महिलांकडून घरोघरी गणपतीसमोर जाऊन वाटल्या जातात. महिला हातात परात घेऊन गावातील प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीसमोर आपला हौसा ठेवतात. नववधू महिल्या  हातात सुपली घेऊन हौशे वाटतात व घरातील वडीलधारी माणसांच्या पाया पडतात अनेक गावामध्ये चतुर्थीच्या गौरी पूजनादिवशी आम्हाला अशा पद्धतीने महिला घराघरामध्ये हौसा घेऊन जाताना दिसतात.

माटोळीची सजावट

 माटोळीची अनेक प्रकारे सजावट केली जाते. माटोळीब्प् सर्व प्रकारची फळे बांधली जातात. तसेच रानात मिळणारी खास रानफळे व फुले बांधली जाते. यात कांगले, कात्रे, कमडळा, कध्याफळ, ताबलेफळ, भिल्लफळ, माट्टीकात्रे, पत्रेफळे, कुढय़ाकात्रे, उमळीफळ, आटकेफळ, मावळिंग, अशी अनेक रानटी फळे फुले माटोळीला बांधली जातात. माटोळी सजविली जातात. खास चतुर्थीमध्ये अशी फळे फुले बाजारात व्रिकीस दाखल होत असतात.

ओझे देण्याची पद्धत

आजूनही गोव्यातील नववधुला तिच्या माहेराहून सासरी ओझे दिले जाते. यात चतुर्थीला लागणारा सर्व साहित्य गोडधोड पदार्थ देवाचे साहित्य. अशा पद्धतीचे साहित्य  लोक आपल्या ऐपतीप्रमाणे असे साहित्य देत असतात. पूर्वी मोठय़ा प्रमाणात लोक असे ओझे घेत होते. एक प्रकारे हा हुंडय़ाचा प्रकार कसा होता पण आता ही प्रथा मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. आता लोक असे ओझे घेत नाही. पूर्वी माटोळी पासून ते सर्व साहित्य नववधुला सासरी द्यावे लागत होते. त्यामुळे गरीब लोकांना याचा त्रास होत होता. आता  हा प्रकार कमी झाला आहे

Related posts: