|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » कुलगाम सेक्टरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगाम सेक्टरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

भारत-पाकिस्तान सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱया कुरापती दिवसेंदिवस वाढत जात आहेत. शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काजीगुंड भागात एक दहशतवादी लपल्याची शक्मयता असल्याने सध्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यातआली आहे. चकमकीनंतर बारामुल्ला-काजीगुंड भागातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली असून जवानांकडून शोधकार्य सुरू आहे. कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली.

Related posts: