|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » मनोहर पर्रीकरांच्या तब्येतीत बिघाड ; दिल्लीतील एम्स रूग्णालयात होणार दाखल

मनोहर पर्रीकरांच्या तब्येतीत बिघाड ; दिल्लीतील एम्स रूग्णालयात होणार दाखल 

ऑनलाईन टीम / पणजी :

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी गोव्याहून एका विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना होणार आहेत.

मागील दोन दिवसांपासून कलंगुट येथील खासगी रुग्णालयात मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी काल घरी परतले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुन्हा आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेणार आहेत. बुधवारी मनोहर पर्रीकर मंत्रालयात हजर होणार होते. अमेरिकेहून परतल्यानंतर गेले आठ दिवस पर्रीकरांनी मंत्रालयाला भेट दिलेली नाही. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्य, घटकपक्षाचे नेते किंवा भाजपाच्या कोअर कमिटीलाही भेटण्याचे त्यांनी टाळले आहे.

Related posts: