|Sunday, February 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » स्वच्छता ही सेवा ठरावी!

स्वच्छता ही सेवा ठरावी! 

पंतप्रधानांचे प्रतिपादन : मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू : मागील 4 वर्षांमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक सफाई

  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

4 वर्षांपासून सुरू असलेल्या स्वच्छतेच्या मोहिमेला देशभरातून लोकांचा मोठा पाठिंबा मिळतोय. प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत भाग घेतला असून आतापर्यंत 450 जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत. गेल्या 60 वर्षांत जे झालं नाही, ते 4 वर्षांत करून दाखविल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेच्या कार्यक्रमाला संबोधित करताना काढले आहेत. केवळ शौचालये निर्माण केल्याने भारत स्वच्छ होणार नाही, तर स्वच्छतेची सवय व्हायला हवी असेही मोदींनी यावेळी म्हटले.

या कार्यक्रमावेळी मोदींनी सामान्यांसोबतच अभिनेता अमिताभ बच्चन आणि उद्योगपती रतना टाटा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्याचबरोबर पंतप्रधानांनी अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांच्याशी चर्चा केली. अमिताभ यांनी पंतप्रधान मोदींना मोहिमेच्या यशाचे शेय दिले.

माझा चेहरा आणि बुद्धी वापरुन सरकार प्रयत्न करत आहे, परंतु एवढे पुरेसे नाही. स्वच्छतेसाठी वैयक्तिक स्तरावर देखील प्रयत्न व्हावेत. आम्ही देखील वैयक्तिक स्तरावर काम करतोय. मुंबईच्या वर्सेवा किनाऱयावर स्वच्छतेसाठी मोहीम राबविली. तेथे स्वच्छतेसाठी जमीन खोदणारे यंत्र नसल्याचे लोकांनी सांगितले, तेव्हा r ते यंत्र खरेदी करून दिले. कचरा उचलण्यासाठी त्यांना ट्रक्टर उपलब्ध करून दिल्याचे अमिताभ यांनी यावेळी म्हटले.

स्वच्छता मोहिमेशी आम्ही कायम जोडलेले राहू. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यात योगदान देण्याचा आमचा विचार असल्याचे रतन टाटा यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान मोदींनी टाटा समुहाच्या योगदानाचे यावेळी कौतुक केले. आसामच्या डिब्रूगढ आणि गुजरातच्या मेहसाणा येथे सक्रीय स्वच्छाग्रहींशी देखील मोदींनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला आहे.

उल्लेखनीय प्रगती

स्वच्छतेची व्याप्ती एकेकाळी 40 टक्के होती, आता हेच प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. 4 वर्षांमध्ये आम्ही स्वच्छतेप्रकरणी मागील 60 ते 70 वर्षांमध्ये शक्य न झालेली प्रगती करू असे विचार कोणीच केला नसेल. 4 वर्षांमध्ये 8 कोटी शौचालये उभारली गेली, 4.5 लाख, 450 जिल्हे तसेच 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश उघडय़ावरील शौचाच्या समस्येपासून मुक्त झाल्याचे मोदींनी सांगितले.

लोकांचे जीव वाचणार

मोहिमेला मिळालेले यश हे सर्व भारतीय तसेच स्वच्छाग्रहींच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 3 लाख लोकांचा जीव स्वच्छतेमुळे वाचविला जाऊ शकतो. परंतु केवळ शौचालये निर्माण झाल्याने भारत स्वच्छ होईल असे नाही. स्वच्छता ही एक सवय असून जी दैनंदिन जीवनात बाळगावी लागत असल्याचे मोदी म्हणाले.

Related posts: