|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » अभय महाजन आणि दिप्ती सती आहेत ‘लकी’ कलाकार

अभय महाजन आणि दिप्ती सती आहेत ‘लकी’ कलाकार 

संजय जाधव हय़ांनी आपल्या लकी चित्रपटाची घोषणा केल्यावर त्यामधील कलाकार कोण असतील हय़ाविषयी गेले कित्येक दिवस सिनेसफष्टीत उत्सुकता होती. सई ताम्हणकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, स्पफहा जोशी, श्रेया बुगडे, सोनाली खरे हय़ा कलाकारांनी तेच लकी असल्याचे जाहीर केले.

मात्र आता खुद्द संजय जाधव हय़ांनी त्यांच्या चित्रपटातल्या लकी कलाकारांची घोषणा केली आहे. अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती आपल्या चित्रपटाचे हिरो-हिरॉईन असल्याची घोषणा संजय जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे. वैशिष्टय़ म्हणजे, आपल्या कलाकारांना लाँच करताना त्यांनी एक गाणेच चित्रीत केले आहे. याविषयी निर्माते सुरज सिंग म्हणतात, हेच तर दादांचे वैशिष्टय़ आहे. दादा नेहमी काहीतरी वेगळे करतात. त्यांनी त्यांच्या मागच्या चित्रपटाचा टिझर 60 पॅमेऱयांनी चित्रीत केला होता. तर आता आमच्या चित्रपटाचे हिरो-हिरोइन लाँच करताना हे धमाल गाणे दादांनी त्यांच्या स्टाइलने चित्रीत केले आहे. आता जेवढे गाणे मनोरंजक आहे. त्यापेक्षाही अधिक धमाल तुम्हांला हा चित्रपट पाहताना येईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. अहो, दादा आता सांगा नंबर कुणाचा आला हय़ा गाण्याचे गीत सचिन पाठक हय़ांनी लिहिले आहे. तर पंकज पडघन यांनी ते संगीतबद्ध केले आहे. अमितराज, सायली पंकज आणि रोहित राऊत यांनी हे धमाल गाणे गायले आहे. उमेश जाधव यांनी गाण्याची कोरीओग्राफी केली आहे. 

बी लाइव्ह प्रॉडक्शन्स आणि ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दीपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, अभय महाजन आणि दिप्ती सती यांच्या अभिनयाने सजलेला, संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगफहांमध्ये झळकणार आहे.

 

Related posts: