|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गौरी गीतांमुळे ग्रामीण भागात रात्रीनांही सूर

गौरी गीतांमुळे ग्रामीण भागात रात्रीनांही सूर 

वार्ताहर / व्हनाळी

गणपती -गौरीच्या आगमनाने ग्रामीण भागात गौरी-गणपतीच्या गीतानी रात्रीनाही सूर सापडला आहे.माहेरी आलेल्या मुली झिम्मा फुगडीत रंगून जात आहेत.      नागपंचमीच्या दिवसा पासूनसुरू होणारा झिम्मा-फुगडी हा महिलांचा आवडता खेळ.गणेश चतुर्थीपासून याला खरा रंग चढतो.लहान मुली पासून व्रध्द स्त्रियापर्यंत सर्व वयोगटातील स्त्रिया व माहेरवाशीणी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसत आहेत.

   ऐलमा पैलमा गणेश देवा……

माहेरच्या गं  लेकी जमलो सा-या जणी,फेर धरुणी गातो गौरीची गं गाणी…

पोरी पिंगा गं पोरी पिंगा । तुज्या पिंग्यानं मला बोलिवल रात जागवली पोरी पिंगा…… घागर घुमू दे…  तसेच नवीन गारी गीते   गवर मानाची पानाची… या अशा नानाविध लोकगीतांचे सूर गावच्या चौका बरोबरच गल्ली बोळात  गारीच्या गीतांवर ग्रामिण भागातील महिला रात्री जागून या गीतांचा फेर धरल्याने संपुर्ण वातावर भक्तीमय झाले असून प्रत्येक सार्वजनिक गणपती मंडळांच्या स्टेज मंडपासमोर आंगणात रात्री उशिरापर्यंत या गारी गीतांच्या महिलांच्या गाण्यांचा सुरू सर्वत्र कानी पडत आहे. गेले चार दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने गारी गीताना रंगत आली आहे.

ग्रामीण भागातही जीवंत देखाव्याच्या तालमी बरोबरच पुरुष मंडळी भजन,शाहिरी गाण्यांच्या माध्यमातून गणपतीचे जागरण करीत रात्र जागवत आहेत.

काल रात्री गाराई जागरणात गार आंगात येवून जुन्या परंपरेनुसार गाराईचा मोठय़ा भक्तीमय वातावरणात महिलांनी जागर करून स्वागत केले. यावेळी गाराईला कांही महिलांना ईनत्या घालून आपल्या मुला बाळांच्या नोकरी,लग्ना संदर्भात विचारना केली. गाराईने देखील सर्वांचे कल्याण होईल पण सर्वांनी थोडा वेळ भक्ती मार्गात द्यावा असे सांगून गाराईने सर्वांना आर्शिवाद दिला. अशा प्रकारे गारी सणानिमित्त मोठय़ा उत्सहात महिलांनी गौरी सण मोठय़ा उत्सहात साजरा करण्यात आला.