|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘युवतींचे आरोग्य’ या विषयावर कार्यशाळा

‘युवतींचे आरोग्य’ या विषयावर कार्यशाळा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत महावीर महाविद्यालयात ‘युवतींचे आरोग्य’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन समाजशास्त्र विभागातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.पी.लोखंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. पांडूरंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यशाळेत सहभागी युवतींना डॉ.अर्चना खाडे यांनी प्रश्नोत्तरांच्या आधारे मार्गदर्शन केले. तसेच किशोरवयीन युवतींचे मानसिक आरोग्य कसे जपावे, या विषयावर उर्मिला चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.पांडूरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. समन्वयक म्हणून डॉ.उषा पाटील यांनी काम पाहिले. ही कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा.अंकुश गोंडगे, प्रा.उमेश वांगदरे यांनी परीश्रम घेतले.

 

 

 

 

 

Related posts: