|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » राजीव बन्सल यांना 12.17 कोटी देण्याचा इन्फोसिसला आदेश

राजीव बन्सल यांना 12.17 कोटी देण्याचा इन्फोसिसला आदेश 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माजी प्रमुख वित्तीय अधिकारी राजीव बन्सल यांना 12.17 कोटी रुपये देण्याचा आदेश इन्फोसिसला देण्यात आला. या रकमेवर व्याजही आकारण्यात येणार आहे. 2015 मध्ये बन्सल यांनी इन्फोसिसचा राजीनामा दिला होता. यानंतर 17.38 कोटी रुपयांचे सेवरेंस पेमेन्ट मिळण्याची त्यांची अपेक्षा होता. मात्र कंपनीकडून त्यांना केवळ 5.2 कोटी रुपये देण्यात आली होती. बन्सल यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारींचे त्यांनी पालन न केल्याचे कंपनीने म्हटले होते.

या निर्णयाविरोधात बन्सल यांनी लवादाकडे धाव घेतली होती. यानंतर इन्फोसिसने बन्सल यांच्याविरोधात प्रतिदावा करत पहिल्यांदा देण्यात आलेली रक्कम परत करण्याचा आणि अन्य नुकसानभरपाई देण्यास सांगितले होते. बन्सल यांना देण्यात आलेल्या पॅकेजमुळे इन्फोसिसमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा वाद निर्माण झाला होता. या वादामुळे इन्फोसिसचे तत्कालीन सीईओ विशाल सिक्का आणि चार संचालकांना पद सोडावे लागले होते. यामध्ये तत्कालीने अध्यक्ष सेशासायी यांचा समावेश आहे.