|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पिंपरीची ओळख निर्माण करुन इतिहास घडवणार:कदम

पिंपरीची ओळख निर्माण करुन इतिहास घडवणार:कदम 

प्रतिनिधी/ म्हसवड

कायम दुष्काळी असलेल्या या भागातील पिंपरी (ता. माण) गावाचा जी.आय.सी च्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे. पिंपरीच्या ग्रामस्थाच्या सहकार्याने व जी. आय सीच्या माध्यमातून वेगळा इतिहास निर्माण करुन गावात नव नवीन कामे प्रोजेक्टची कामे सुरु आहे. त्याचबरोबर गावाला एक वेगळी ओळख देण्याचे काम करण्याचा प्रयत्न नंदकुमार शिलवंत यांच्या माध्यमातून करणार असल्याचे प्रतिपादन जी. आय. सी. चे असि. जनरल मँनेजर नामदेव कदम यांनी केले.

 भारतीय सर्वसाधारण बीमा महामंडळ मुंबई यांच्या वतीने सी. एस. आर.  अंतर्गत गाव दत्तक योजनेचा पिंपरी गाव दत्तक घेण्याच्या शुभारंभा प्रसंगी   जी. आय. सी. चे असि. मॅनेजर नामदेव कदम, सिनि. मॅनेजर प्रकाश मुडबिद्री, सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, माजी सरपंच चंद्रकांत शिलवंत, डेपोटी    मॅनेजर फकीर बसीर, सिने अभिनेते आत्मा बनसोडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील 9 गावे दत्तक घेणार

यावेळी नामदेव कदम म्हणाले, जी. आय. सी. च्या माध्यमातून गावाच्या  विकासाबरोबर गावाला विकासाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करुन पिंपरी गावचा इतिहास बदलणार आहे. पिंपरी गावचे सुपूत्र व सहसचिव मुख्यमंत्री कार्यलय मुंबई नंदकुमार शिलवंत यांच्या माध्यमातून गावाचा चेहरा बदलणार आहे. पिंपरी गावाप्रमाणे महाराष्ट्रातील 9 गावे दत्तक घेवून त्या गावचा चेहरा- मोहरा बदलणार आहे असल्याचे नामदेव कदम यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमात स्वागत दिंगाबर राजगे यांनी तर प्रस्तावना माजी सरपंच चंद्रकांत शिलवंत, आभार मुख्याध्यापक पवार यांनी मानले. राजेंद्र राजगे, दादासाहेब दोरगे, हणमंत राजगे, सुरेश राजगे, नारायण राजगे, दाजी करे, पोपट अवघडे, भारत शिंदे,  किशोर शिलवंत, डॉ. काकासाहेब राजगे खाडेसर आदी मान्यवर उपस्थित होते.