|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नेता निवडण्याची क्षमता भाजपकडे तरी आहे का ?

नेता निवडण्याची क्षमता भाजपकडे तरी आहे का ? 

प्रतिनिधी/ पणजी

भाजपकडे तरी नेता निवडण्याची क्षमता आहे, काय असा सवाल उपस्थित करून काँग्रेसचे केंद्रीय नेते चेल्लाकुमार यांनी भाजपवर पलटवार केला आहे. काँग्रेसने अगोदर आपला नेता निवडावा व नंतरच सत्ता स्थापनेचा दावा करावा, अशी टीका भाजपने केली होती. त्याला उत्तर देताना चेल्लाकुमार यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे.

काँग्रेसला नेता निवडण्याचा सल्ला देण्याऱया भाजपला नेता निवडता येतो का? पर्रीकर वगळता दुसरा नेता निवडण्याच्या स्थितीत सध्या भाजप आहे काय? असा थेट सवाल चेल्लाकुमार यांनी केला आहे.

राजकारणातील पारदर्शकतेबाबत पंतप्रधान मोदी सतत बोलत असतात. पण त्यांच्या स्वत:च्या पक्षाने तरी राजकीय पारदर्शकता पाळली का, असा प्रश्न चेल्लाकुमार यांनी केला. विशेष करून गोव्यातील कोणत्या निर्णयाबाबत पारदर्शकता पाळली हे मोदी यांनी स्पष्ट करावे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेले काही महिने इस्पितळात आहेत. मात्र आजपर्यंत पर्रीकर यांना कोणता आजार आहे याबाबत किंवा त्यांच्या आरोग्याबाबत अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपने स्वत: कधी राजकीय पारदर्शकता पाळली नाही हेच सिद्ध होते असेही ते म्हणाले.