|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News »  इंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ

 इंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आजही पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 11 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 89.80 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे डिझेलचा दर 78.42 रुपयांवर स्थिर आहे. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.

 

मुंबईकरांसोबतच दिल्लीकरांनादेखील पेट्रोल दरवाढीची झळ बसणार आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 12 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 82.44 रुपये मोजावे लागतील. मुंबईसोबतच दिल्लीतही डिझेलचे दर वाढलेले नाहीत. दिल्लीत डिझेलचा दर 73.87 रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र त्याआधीच्या 13 दिवसांमध्ये डिझेलच्या दरात जवळपास दीड रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे.