|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » लोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू

लोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू 

ऑनलाईन टीम / अमरावती :

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. शेतकऱयांना साले म्हणून संबोधणाऱया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव करुनच जालन्यातून परत येऊ, असा पण बच्चू कडू यांनी केला आहे..

 

रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांआधी शेतकऱयांना ’साले’ म्हणून संबोधलं होतं. त्यांनी संबोधलेल्या या वाक्मयाचा आमदार बच्चू कडू यांनी जाहीर निषेध केला होताच, तर शेतकऱ्यांना साले संबोधणाऱया दानवेंच्या विरोधत आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभा निवडणूक लढवू, असंही त्यांनी जाहीर केले होते.

 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जालना मतदारसंघातून आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

 

 

Related posts: