|Monday, August 19, 2019
You are here: Home » leadingnews » फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष मोदींना चोर म्हणाले : राहुल गांधींचा आरोप

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष मोदींना चोर म्हणाले : राहुल गांधींचा आरोप 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली ::

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रानस्वा ओलांद पंतप्रधन नरेंद्र मोदी यांना चोर म्हणत आहेत, हा देशाचा अपमान आहे. राफेल करारावरुन सरकारने जनतेची, सैन्याची फसवणूक केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदींवर केला आहे.

सर्वसामान्य जनतेचा पैसा मोदींनी अनिल अंबानी यांच्या खिशात घातला. मोदींनी अंबानी यांना 30 हजार कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याचा आरोपही राहुल यांनी केला आहे. तर या घोटाळय़ाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या दाव्यानंतर राहुल यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधन मोदींवर जोरदार हल्ला चढवला. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष आपल्या पंतप्रधानांबर्दंदल असे आरोप करत असल्याने मला वाईट वात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. भारताच्या पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे खरे काय आहे ते मोदींनी देशाला सांगावा हेच मला सांगायचे आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.