|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फॉर्मेलिन विषयी काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल

फॉर्मेलिन विषयी काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल 

विश्वजित राणे यांचा आरोप , खुल्या चर्चेंचे आव्हान

प्रतिनिधी/ पणजी

 काँग्रेस तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे फॉर्मेलिन विषयी लोकांची दिशाभूल करत असून राज्यात उपलब्ध होणारी मासळीची एफडीएकडून दररोज तपासणी केली जात आहे. त्यामुळे कांग्रेसने केलेले आरोप हे चुकीचे आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 सध्या काँग्रेस पक्षाकडे कसलेच विषय नसल्याने तसेच सत्तेसाठी हपापले असल्याने प्रत्येकवेळी फॉर्मेलिनचा विषय घेऊन लोकांमध्ये चुकीची माहिती पसरविण्याचे काम गिरीश चोडणकर यांच्याकडून केले जात आहे. एफडीएचे अधिकारी मडगाव, म्हापसा, पणजी, फोंडा सर्व मासळी मार्केटमध्ये मासळीची तपासणी करत आहेत. राज्यात आता फॉर्मेलिनयुक्त मासळी येत नाही. जर गिरीश चोडणकर यांना फॉर्मेलिन मासळी मिळत असेल तर त्यांनी दाखवावी. आम्ही त्यांच्यासोबत राज्यातील कुठल्याही मासळी मार्केटमध्ये यायला तयार आहे, असे आव्हान यावेळी विश्वजित राणे यांनी केले.

गरीब मासळी विक्रेत्यांवर परिणाम 

लोकांमध्ये घबराहट पसरविण्याचे काम कॉंग्रेसकडून केले जात आहे. त्ंयांच्यामुळे sराज्यातील गरीब मासळी विपेत्यांचा धंदा कमी झाला आहे गोव्याचा पर्यटनावर याचा परिणाम झाला आहे. खोटी प्रसिद्धी करुन काँगेस गोव्याचे नुकसान करत आहे. चोडणकरांना जास्त माहिती असेल तर त्यांनी जनतेला स्पष्ट सांगावे. लोकांनी कॉंगेसच्या खोटय़ा भुलथापांना बळी पडू नये. चोडणकर यांना जर फॉर्मेलिनविषयी जास्त माहिती असेल तर त्यांनी माझ्या सोबत खुली चर्चा करण्यास यावे, असे आव्हान rयावेळीराणे यांनी केले.

 एफडीए आता तालुकापातळीवर तपासणी करणार आहे. चिकन, फळे, भाजी सगळय़ांची तपासणी सुरु आहे. लोकांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे यासाठी हे sसरकार प्रयत्न करत आहे. विरोधक सध्या सत्तेसाठी हपापले असून त्यामुळे अशी कसलीही विधाने करत आहे. सध्या राज्यात आरोग्य क्षेत्रात चांगले काम होत आहे हे काँग्रेस पक्षाकडून बघता येत नसल्याने असे केले जात आहे. कॉंगेसच्या कुठल्याही नेत्यांसोबत आम्ही फॉर्मेलिनविषयी खुली चर्चा करण्यास तयार आहोत असेही यावेळी  राणे यांनी सांगितले. यावेळी एफडीएच्या संचालिका ज्योती सरदेसाई उपस्थित होत्या.