|Saturday, February 22, 2020
You are here: Home » leadingnews » ‘बाप्पा चालले गावा’ ; पुण्यात मानाच्या गणपतींचे विसर्जन

‘बाप्पा चालले गावा’ ; पुण्यात मानाच्या गणपतींचे विसर्जन 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुढील वषी लवकर येण्याचे सांगत आपल्या गणरायाला भक्त आज निरोप देत आहेत. मागील दहा दिवसांपासून सेवा केल्यानंतर रविवारी सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. मुंबईतील गणेश मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. त्यादृष्टीने प्रशासनही सज्ज आहे. तर पुण्यात गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत आणि शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केले आहे.  मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती सकाळी आठच्या सुमारास मार्गस्थ झाला. मुंबईतील पहिला मानाचा गणपती म्हणून गणेश गल्लीचा गणपती ओळखला जातो. गणेश गल्लीच्या गणपतीच्या मिरवणुकीनंतर अन्य गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात होईल.

    पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आरती करून मंडई पासून मनाच्या गणपतीची मिरवणूक सुरु झाली. रंगोळय़ाच्या पायघड्या, ढोल ताशा पथकाच्या गजरात ही मिरवणूक 2 वाजून 50 मिनिटांनी टीळक चौकात पोहचली, यावी महापौर मुक्ता टीळक यांनी स्वागत केले. त्यानंतर सव्वा चारच्या सुमारास पहिल्या मनाच्या गणपतीचे विसर्जन झाले. पुणे शहरातील वैभवशाली मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाल्यानंतर तब्बल सहा तासाने पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचे विसर्जन पतंगा घाटावर झाले कसबा गणपतीची आरती महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम पद्धतीने उभारण्यात आलेल्या हौदात विसर्जन 4 वाजून 03 मिनिटांनी करण्यात आले. मनाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती फुलांच्या रथामध्ये विराजमान झाला आहे. मनाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीसमोर वाई येथील महागणपती ची मूर्ती सगळय़ांचे लक्ष वेधून घेत आहे. मनाचा पाचवा गणपती केसरिवाडा मंडळाने लोकमान्य रथ साकारला आहे.

 

 UPDATE :

 

 • पुणे गणपती विसर्जन मिरवणूक : मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीला सुरुवात
 •  मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीआधी महिलांचे  कोळी नृत्य
 • मुंबई-पुण्यासह राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
 •  सोलापूर : सोलापुरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ, शहरातील प्रमुख मंडळाच्या मिरवणूकीला सुरुवात
 • अहमदनगरचे ग्रामदैवत विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीस सुरुवात
 • पुणे गणपती विसर्जन मिरवणूक : मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं महात्मा फुले मंडईत आगमन
 •  लालबागच्या राजाचा मिरवणूक मार्ग रांगोळ्यांनी, फुलांच्या आणि पैशांच्या माळांनी सजला
 • हजारो भाविकांचा उत्साह शिगेला 
 • पुण्यात साडे दहा नंतर विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार
 • पुढच्या वर्षी विघ्नहर्त्याचे आगमन ११ दिवस लवकर!
 • मंबई : गणेश विसर्जनानिमित्त मध्य रेल्वेवर रात्री उशिरापर्यंत सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-कल्याण; पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार दरम्यान विशेष लोकलसेवा सुरू राहणार 
 • अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आज रेल्वेकडून मेगाब्लॉक रद्द
 • गणपती विसर्जनासाठी मुंबई सज्ज, चौपाट्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

Related posts: