|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पेट्रोल-डिझेलची पुन्हा दरवाढ

पेट्रोल-डिझेलची पुन्हा दरवाढ 

नवी दिल्ली :

देशभरात पेट्रोल-डिझेलची दरवाढ रविवारी पुन्हा झाली असून इंधन दरवाढ सातत्याने सुरुच असल्याचे पहावयास मिळत आहे. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 17 पैशांची तर डिझेलच्या दरात 10 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत डिझेल दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसात डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती पण रविवारी त्यात वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत रविवारी पेट्रोल 17 पैशांनी तर डिझेल 10 पैशांनी वाढल्यामुळे पेट्रोलसाठी 82.61 रुपये तर डिझेलसाठी 73.97 रुपये असा नवीन दर झाला आहे. मुंबईकरांना रविवारी प्रतिलिटर पेट्रोलसाठी 89.97 रुपये तर डिझेलसाठी 78.53 रुपये मोजावे लागत होते.