|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अकरा दिवसांच्या गणरायांचे विसर्जन

अकरा दिवसांच्या गणरायांचे विसर्जन 

प्रतिनिधी/ पणजी

अकरा दिवसांच्या गणपतीचे काल राज्यात थाटात विसर्जन करण्यात आले. लेझीम पथके, बँड पथके आणि ढोल ताशांच्या गजरात गणेशभक्तांनी गणपतीला निरोप दिला. दारूकामाची आतशबाजी आणि गणरायाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. 11 दिवसांच्या गणपतीमध्ये सार्वजनिक गणपतींचा समावेश जास्त असतो.

 काल संध्याकाळपासूनच गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली. बँड पथकांच्या तालावर आणि ढोल ताशांच्या गजरात बेधुंदपणे नाचत गात गणेशभक्तांनी गणरायाला निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या होत्या. राज्यात आता 21 दिवसांचा गणेशोत्सव सुरू आहे.

Related posts: