|Friday, December 13, 2019
You are here: Home » leadingnews » लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला. राजाच्या विसर्जनावेळी एक बोट समुद्रात बुडाल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बोटीतील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. महिलेसह एका मुलगा उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान,पुढच्या वषी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्मया बाप्पाला लाखो भक्तांनी गिरगावच्या चौपाटीत भक्तिमय वातावरणात निरोप दिला. तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आले. गेल्या 10 दिवसांपासून बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी (23 सप्टेंबर) नाचत-गाजत निरोप देण्यात आला.

 

Related posts: