|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी 

बालासोर

 भारताने ओडिशातील क्षेपणास्त्र चाचणी केंद्रातून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. या यशासोबतच भारताने दोन आवरणयुक्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाची कामगिरी प्राप्त केली आहे. ओडिशामध्ये चांदीपूरच्या दक्षिणेस सुमारे 70 किलोमीटर अंतरावर स्थित अब्दुल कलाम बेटावरून रविवारी रात्री 8 वाजून 5 मिनिटाला इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या बेटाला अगोदर व्हीलर बेट या नावाने ओळखले जायचे.पृथ्वी सुरक्षा यान (पीडीव्ही)  इंटरसेप्टर आणि लक्ष्य क्षेपणास्त्र दोन्ही यशस्वीपणे जोडले गेले होते. पीडीव्ही मिशन पृथ्वीच्या वायुमंडळात 50 किलोमीटरपेक्षाही अधिक उंचीवरील लक्ष्याला भेदण्यास सक्षम आहे. याचे तंत्रज्ञान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. या अगोदर 11 फेब्रुवारी 2017 रोजी अब्दुल कलाम बेटावरूनच इंटरसेप्टरची चाचणी घेण्यात आली होती.

 

Related posts: