|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आगामी निवडणुकांसाठी काँगेस-राष्ट्रवादी आघाडी करा

आगामी निवडणुकांसाठी काँगेस-राष्ट्रवादी आघाडी करा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जयकुमार शिंदे व सरचिटणीस किसन कल्याणकर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले. पाटील यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन कल्याणकर व शिंदे यांनी आगामी निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा केली.

 जिह्यातील विधानसभा व लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी करावी अशी मागणी शिंदे यांनी केली. दरम्यान कार्यकर्त्यांच्या मागण्या आणि त्यांचा राजकीय ठोकताळा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवला जाईल अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली

Related posts: