|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » इंधन दरवाढीचा भडका सुरूच ! राज्यात पेट्रोल नव्वदीपार

इंधन दरवाढीचा भडका सुरूच ! राज्यात पेट्रोल नव्वदीपार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

इंधन दरवाढीमुळे होणारी सामान्यांची होरपळ सुरुच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ झाली आहे. मुंबईतपेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 90.22 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातील वाढदेखील सुरुच आहे. आज मुंबईत डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक लिटर डिझेलचा दर 78.69 रुपयांवर पोहोचला आहे.

सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. मुंबईसोबतच राजधनी दिल्लीतही पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. दिल्लीतही पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज दिल्लीकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 82.86, तर डिझेलसाठी 74.12 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत आज डिझेलच्या 10 पैशांची वाढ झाली आहे. राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाजीपाल्यांसह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्मयता आहे.